शेतकरी स्त्रिया आणि टाळेबंदी
सीमा कुलकर्णी
०४ सप्टेंबर २०२०
कोविडच्या काळात सर्वत्र टाळेबंदी लागू केली व त्यामुळे सर्व आर्थिक गणित मोठ्या मोठ्या उद्योगांपासूनच गडगडले. त्याचा सर्वात जास्त परिणाम कष्टकरी वर्गावर झाला आणि हे सांगायला नकोच की, त्यातही स्त्रियांवर अधिक झाला. कोरोनाच्या या जागतिक साथीमुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत तर काही जुनेच दुर्लक्षित प्रश्न ठळक झालेत. त्यातलाच एक आहे- स्त्रियांचे श्रम, जे कधीच मोजले न जाणे किंवा त्यांना स्वतंत्रपण…